AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
04 Jan 20, 01:00 PM
कृषि वार्ताकृषी जागरण
पीएम-किसान सन्मान निधीची स्थिती जाणण्यासाठीची पध्दत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ जानेवारी २०२० रोजी पंतप्रधान-किसान सन्मान निधी योजनेचा तिसरा हप्ता जाहीर केला. या योजनेचा फायदा सुमारे ६ कोटी शेतकऱ्यांना झाला आहे. पंतप्रधान-किसान योजनेसाठी अर्ज कसा करावा? पंप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकर्‍यांना भारत सरकारच्या अधिकृत वेबसाइट म्हणजेच pmkisan.gov.in वर नोंदणी करावी लागेल. पंतप्रधान-किसान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे बँक खाते आधार कार्ड जमीन धारक कागदपत्रे नागरिकत्व प्रमाणपत्र पंतप्रधान किसान योजनेंतर्गत स्थिती किंवा लाभार्थी यादी तपासण्यासाठी शेतकऱ्यांना खाली दिलेल्या टप्प्यांनुसार करावे लागेलः टप्पा १ - अधिकृत वेबसाइटवर जा - www.pmkisan.gov.in/ टप्पा २ - मेनू बारवरील ‘Farmers corner’ पर्याय पाहा टप्पा ३ - आता आपली पंतप्रधान-किसान स्थिती तपासण्यासाठी 'beneficiary status' वर क्लिक करा टप्पा ४ - 'beneficiary list' तपासण्यासाठी - आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा, गट आणि गावाचे नाव अचूक लिहा. टप्पा ५ - नंतर 'Get Report' वर क्लिक करा टप्पा ६ - आपले तपशील स्क्रीनवर दिसून येतील संदर्भ – कृषी जागरण, ३ जानेवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
1620
1