AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
03 Jan 20, 01:00 PM
कृषी वार्तालोकमत
6 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १२ हजार कोटी जमा
कर्नाटक – पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत एकाच वेळी देशातील सहा कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी १२ हजार कोटी रूपये जमा केले. गेल्या वर्षी ही योजना जाहीर करण्यात आली, तेव्हा अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी चार टप्प्यांत आठ हजार रू. देण्याचे ठरले होते. नंतर सर्वच शेतकऱ्यांना तीन महिन्यांना दोन हजार याप्रमाणे एकूण ८ हजार रू. देण्याचे जाहीर करण्यात आले. त्यापैकी दोन हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात आधीच जमा करण्यात आली आहे. हा तिसरा हप्ता आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात दोन हजार रू. हप्ता जमा झाले की नाही, याची माहिती आता टोल फ्री नंबरच्या माध्यमातून घेता येईल. केंद्राने लाभार्थी शेतकऱ्यांसाठी 155261 हा टोल फ्री नंबर सुरू केला आहे. संदर्भ – लोकमत, 3 जानेवारी 2020 जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
1480
26