कृषि वार्ताकृषी जागरण
या' शेतकऱ्यांना योजनेचा फायदा होणार नाही
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी' योजनेचा फायदा या शेतकऱ्यांना होणार नाही. 'पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी' योजने अंतर्गत, ज्या शेतकऱ्यांच्या नावावर १ फेब्रुवारी २०१९ पर्यंत जमीनची नोंदणी आहे, त्यांनाच दरवर्षी ६ हजार रक्कम मिळेल. या तारखेनंतर, जमिनीची खरेदी व विक्री झाल्यानंतर जमीन कागदपत्रांमध्ये काही बदल झाला, तर पुढील ५ वर्षे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तथापि, जर जमीन हस्तांतरणात कुटूंबातील एका व्यक्तीच्या नावावरून दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर झाली, तर तो या योजनेसाठी लाभार्थी मानला जाईन.
लाभार्थी शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायतमध्ये जाहीर केली जाईल. यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांची योजना 'पीएम-किसान पोर्टल' www.pmkisan.gov.in वर अपलोड केली जाईल. अशा परिस्थितीत, ज्या शेतकऱ्यांना असे वाटते की, या योजने अंतर्गत समावेश होऊ शकतो, पण या योजनेमध्ये नाव नाही, त्यांना ते याविषयी मंडल अधिकाऱ्यांजवळ तक्रार नोंदवू शकतात. संदर्भ – कृषी जागरण, ४ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
482
0
संबंधित लेख