AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
23 Feb 20, 01:00 PM
कृषी वार्ताNavbharat Times
किसान क्रेडिट कार्डसाठी ‘अशा’ प्रकारे करू शकता अर्ज
केसीसीसाठी अनेक बँका ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा देतात. यासाठी बॅंकेच्या ऑफिशियल वेबसाइटवर जाऊन, अर्ज करण्याचा फॉर्म प्राप्त होईल . यानंतर काय करावे ही माहिती खालीलप्रमाणे आहे.
1. बँकेच्या ऑफिशियल वेबसाइटवर जा आणि किसान क्रेडिट कार्डचा पर्याय निवडा. 2. 'Apply' बटणावर क्लिक करताच, आपल्याला ऑनलाइन अर्ज दिसेल. 3. फॉर्ममध्ये निर्देशित जागा भरा आणि शेवटी सबमिट बटणावर क्लिक करा. फॉर्म सबमिट केल्यानंतर एक अ‍ॅप्लीकेशन रेफरंस नंबर जनरेट होईल या नंबरची नोंदणी करावी आणि त्यानंतर कोणतीही शंका असल्याचा याचा वापर करावा. किती दिवसात बनेल कार्ड फॉर्म भरल्यानंतर बॅक केसीसाठी आपली पात्रता पाहिली जाईल. आपण यामध्ये यशस्वी झाला तर पुढील 3-4 दिवसात बॅक आपल्याला कॉल करेल आणि कागदपत्रांची मागणी करेल. एकदा सर्व कागदपत्रांसह बॅंकेने फॉर्म स्वीकारला तर केसीसीसाठीची प्रक्रिया पुढील 7-10 दिवसात बॅंक सुरू करेल. यानंतर आपल्याला एक पावती मिळेल, ज्यावर आपला अ‍ॅप्लीकेशन नंबर दिला जाईल. या नंबरचा वापर करून आपण किसान क्रेडिट कार्ड अ‍ॅप्लीकेशन स्टेटसविषयी माहिती मिळवू शकता. जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर फोटोच्या खाली असलेल्या पिवळ्या अंगठ्याच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायांद्वारे आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेअर करा.
1134
20