AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
10 Jun 19, 06:00 PM
मान्सून समाचारअॅग्रोवन
‘या’ ठिकाणी जोरदार पाऊस पडणार
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे प्रवाह सध्या कमजोर आहेत. यातच अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे मान्सून वेगाने प्रगती करत १३ जूनपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दाखल होणार आहे. मान्सूनच्या राज्यातील आगमनात एक दिवसाची तफावत शक्य आहे. मात्र विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मान्सूनचे आगमन लांबण्याची शक्यता असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली.
अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रामुळे केरळ, लक्षद्वीप, कनार्टक, कोकण, गोव्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडणार असून, सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. उद्यापासून (ता. ११) कोकणात जोरदार पावसाची शक्यता असून, किनाऱ्यावर ताशी ४५ किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. उर्वरित राज्यात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाचा अंदाज आहे, तर विदर्भात उष्ण लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. संदर्भ – अॅग्रोवन, १० जून २०१९ हवामानविषयक महत्वाची माहिती फेसबुक, व्हाॅट्सअ‍ॅप व एसएमएसवर नक्की शेयर करा
260
0