AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
23 Aug 19, 06:00 PM
मान्सून समाचारडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
या आठवडयात हवामान ढगाळ राहील
महाराष्ट्रात या आठवडयात हवामान ढगाळ राहील. त्याचबरोबर पावसाचे प्रमाण ही अल्प राहील. मुंबई, नाशिक, पालघर, ठाणे, नंदुरबार परिसरावरील हवेचे दाब 27 व 28 ऑगस्टला 1004 हेप्टापास्कल इतके कमी राहतील. त्यामुळे त्याचा परिणाम या आठवडयातील पावसाच्या वितरणावर होईन. जेथे हवेचे दाब कमी, तिथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. त्याचबरोबर ज्या ठिकाणी हवेचे दाब अधिक राहतील, तेथे ढगाळ वातावरण व पावसात उघडीप राहील. कृषी सल्ला: १. पूर स्थितीमुळे पिके गेली असल्यास उपाय करा – काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी 8 दिवस पाणी साचल्याने शेतीमध्ये असलेली पिके पाणी साचल्याने कुजली. त्यात भात, बटाटा, भुईमूग, सोयाबीन, भाजीपाला पिकांचा मोठया प्रमाणावर समावेश आहे. शेतीतील या सर्व पूर्वीच्या पिकांचे अवशेष गोळा करून, त्याचा ढीग तयार केल्या कंपोस्ट खत तयार होईल. २. कमी कालावधीत भाजीपाला पिकांची पेरणी करावी. यामध्ये वाघ्या घेवडा, धने, मेथी, कोथिंबीर, पालक, चवळी यासारखी पिके घेऊन कमी वेळात उत्पादन काढणे शक्य होईल. ३. करडई व रब्बी ज्वारी पेरणीसाठी जमिनीची पुर्वमशागत करावी. ४. सदयाचे उभ्या पिकांतील मोठी तणे काढावीत. ५. जनावरांचे आजार- लसीकरण व उपचार करा ६.डाळिंबावर तेल्या, तर पेरूवर फळमाशीचा प्रार्दुर्भाव वाढणे शक्य आहे त्यांची काळजी घ्यावी. ७.पावसात उघडीप होताच, सोयाबीनवर पाने खाणाऱ्या अळया व इतर पिकांवर ही किंडीचा प्रादुर्भाव वाढतो, त्याचे नियंत्रण करावे. संदर्भ – डॉ. जेष्ठ कृषी हवामान तंज्ञ रामचंद्र साबळे
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
40
0