जैविक शेतीअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
निंबोळी पेंडीचा वापर सेंद्रिय शेतीमध्ये फायदेशीर
सेंद्रिय शेतीमध्ये निसर्गत: उपलब्ध असणा-या संसाधनांचा वापर करुन पिकांचे सरंक्षण आणि पीक पोषण केले जाते. वनस्पतीजन्य संसाधनमध्ये कडूनिंबाच्या झाडापासून मिळणा-या पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर सेंद्रिय शेतीमध्ये होतो. यात ही कडूनिंबाच्या बियांपासून तयार होणारी निंबॊळी पेंड मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये वापरली जाते. मे-जून महिन्यात परिपक्व झालेल्या शुध्द निंबॊळ्या गोळा करुन व्यवस्थित वाळविले जातात. त्यापासुन कोल्ड प्रेस्ड पध्दतीने निंबोळी पेंड तयार केली जाते. एक्पेलरमधून तेल न काढता तयार होणारी निंबोळी पेंड जास्त फ़ायदेशीर असते. यात निंबोळी मधील अ‍ॅझाडीरेक्टिन, निम्बीन, सलानिन हे घटक १०० ते १००० पिपिएमपर्यंत तसेच सिलिका १५% सह इतर उपयोगी तत्व आलेले असतात. यात ५ ते ७ टक्के तेल असते. त्यामुळे कीटकनाशक गुणधर्मासह इतर अन्नद्रव्ये शेतात मिसळले जातात. यात नत्र ३- ५%, स्फ़ुरद १% पालाश २% या प्रमाणात असून पिकांच्या मुळांना हळुहळू उपलब्ध होतो. कडूनिंबातील विविध घटक जमिनीमध्ये गेल्यानंतर मुळांद्वारे शोषले जातात. या पद्धतीमुळे जमीनीतील वावरणा-या किडींचे तसेच पिकांवरील रसशोषक किडींचे देखील नियंत्रण होते. जमिनीमध्ये वास्तव्य करणा-या हानिकारक किडी जसे मुळे कुरतडणा-या अळ्य़ा,हुमणी यांचा बंदोबस्त चांगल्या प्रकारे होतो. तसेच भाजीपाला पिकांवर डाळींब पिकाच्या मुळांवर गाठी करणा-या हानिकारक सुत्रकृमींचादेखील बंदोबस्त चांगल्या प्रकारे होतो. पिकांमध्ये निंबोळी पेंड वापरल्यानंतर ३ ते ६ आठवड्यात त्याचे फ़ायदे दिसू लागतात. निंबोळी पेंडमधील घटक जमिनीत हळूहळू काम करत असल्यामुळे सहा महिन्यांपर्यंत याचा परिणाम दिसून येतो.
निंबोळी पेंडचा शेतात वापर:- निंबोळी पेंड शेणखत तसेच इतर सेंद्रिय खतांसोबत वापरण्यास अतिशय सुलभ आहे. रासायनिक खतांच्या बेसल डोसमध्ये देखील वापरता येते. निंबोळी पेंड मुळांच्या कार्यक्षेत्रात व्यवस्थित पोहचेल अशा पध्दतीने टाकावी. फ़ळझाडांमध्ये मुळांच्या जवळ ड्रिपरजवळ खड्डा घेउन त्यात निंबोळी पेंड टाकून मातीने बुजवुन घ्यावी. शेत तयार करताना देखील निंबोळी पेंडचा वापर करता येईल किंवा उभ्या पिकात निंबोळी पेंड फ़ोकुन, हाताने पसरवुन देता येते. भाजीपाला पिकामध्ये बेडमध्ये बेसल डोस टाकताना निंबोली पेंडचा वापर करता येतो. जैविक कीडनाशके-जैविक खते निंबोळी पेंडसोबत सुलभरित्या वापरता येतात. ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, बॅसिलस, बिव्हेरिया, मेटारायझियम, पॅसिलोमायसिस, अ‍ॅझोटॊबॅक्टर, पिएसबी, केएमबी सारख्या उपयुक्त सुक्ष्मजिंवांचा वापर निंबोळी पेंडीला चोळून किंवा सोबत मिक्स करुन करता येतो. प्रमाण:- फ़ळझाड:- १ किलो पासुन ५ किलो प्रति झाड प्रति हंगाम भाजीपाला पिके:- बेसल डोसमध्ये ५०० ते १००० किलो प्रति एकरी केळी:- २५० ग्राम प्रति झाड २ महिन्यांच्या अंतराने ऊस लागवडीच्या वॆळेस ५०० किलो ३ महिन्यांनतर ५०० ते १००० किलो संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर, फोटोखाली दिलेल्या पिवळ्या अंगठ्याच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायांच्या माध्यमातून आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा!
177
1
संबंधित लेख