मान्सून समाचारपुढारी
राज्यात १० ऑगस्टपर्यंत जोरदार पाऊस पडणार
पुणे: राज्यात १० आगस्टपर्यंत जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मराठवाडा, विदर्भात बहुतांश ठिकाणी ५ ते १० ऑगस्ट दरम्यान पाऊस पडण्याचा अंदाज असून, दुष्काळी परिस्थिती असणाऱ्या या भागांमधील पाऊसमान सुधारेल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. ३१ जुलैला कोकणात मुसळदार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार सरी कोसळणार आहे. १ ऑगस्टला मध्य महाराष्ट्र व विदर्भात मुसळधार, मराठवाडयात मध्यम स्वरूपाचा तर कोकण, मुंबईत काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. २ ऑगस्टला कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार, विदर्भ, मराठवाडयात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. मागील दोन-तीन दिवसांपासून राज्याच्या कोकण आणि सह्याद्री पर्वतरांगांमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे, पण आजपासून तीन दिवस म्हणजे २ ऑगस्टपर्यंत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्हयाच्या पश्चिम पर्वतीय भागात अतिवृष्टी होण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. संदर्भ – पुढारी, ३१ जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
76
0
संबंधित लेख