मान्सून समाचारपुढारी
राज्यात तापमानात होणार वाढ
पुणे: मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकल्याने कोकण व घाटमाथा परिसर वगळता, काही दिवसांसाठी राज्यात पावसाची उघदीप राहणार आहे. बहुतेक शहरांच्या तापमानामध्येही एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. पुढील 24 तासात कोकण व घाटमाथा परिसरातील तुरळक भागात हलक्या ते जोरदार स्वरूपाच्या सरी बरसतील, असा अंदाज आहे. येत्या 18 ते 21 ऑगस्टदरम्यान गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ येथे काही ठिकाणी, तर मराठवाडयात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. संदर्भ – पुढारी, १९ ऑगस्ट २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
35
0
संबंधित लेख