AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
11 Oct 19, 06:00 PM
मान्सून समाचारडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
परतीचा मान्सून सुरू राहील
महाराष्ट्रावर हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल राहील, तर ईशान्य भारतावर तो १०१२ हेप्टापास्कल राहील. त्यामुळेच वारे ईशान्येकडून वाहत असून, मोठया प्रमाणावर ढग महाराष्ट्राच्या पूर्व भागात व पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने येत आहेत. यामुळे पाऊस दररोज कोणत्या ना कोणत्या भागात होत आहेत. दि. १४ ऑक्टोबरला हीच हवामान स्थिती राहील. १६ ऑक्टोबरला ईशान्य भारतावरील हवेचे दाब १०१६ हेप्टापास्कलपर्यंत वाढत असून, त्याचा परिणाम १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात दमदार पावसाची शक्यता आहे. २० ऑक्टोबरनंतर मान्सून राज्याच्या उत्तरेकडील भागातून बाहेर पडेल.
कृषी सल्ला १. पाण्याची तपासणी करावी. २. मातीचे आरोग्य आवश्यक तपासावे. ३. पावसात उघदीप होताच, खरीपातील पिकांची काढणी करा. ४. रबी हंगामातील पिकांच्या पेरण्या, लागवडी व रोपे तयार करणे. ५. द्राक्षाची छाटणी १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान करावी. ६. जनावरे, कुकुट पालन यास योग्य वेळी लसीकरण दयावे. संदर्भ – जेष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
88
3