मान्सून समाचारपुढारी
राज्यात पुढील 3 ते 4 पाऊस
राज्यांच्या बहुतांश भागात आज पावसाचे जोरदार पुनरागमन झाले असून, मध्य महाराष्ट्र, विदर्भात बहुतांश ठिकाणी दुपारनंतर मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तर कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार सरी कोसळतील, अशी शक्यता आहे. त्याचबरोबर पुढील 3 ते 4 दिवसात राज्यात ठिकठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस पडले, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पश्चिम राजस्थानातून मान्सूनचा परतीचा प्रवास अदयाप सुरू झाला नसून तो 1 ऑक्टोबरच्या आसपास तेथून एक्झिट घेईल, असा सुधारित अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातूनदेखील मान्सून विलंबाने परतणार आहे. राज्याच्या बहुतांश भागांमधून 15 ते 20 ऑक्टोबरदरम्यान तो परतेल, अशी शक्यता आहे. संदर्भ – पुढारी, 25 सप्टेंबर 2019 जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
121
0
संबंधित लेख