AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
09 Oct 19, 06:00 PM
मान्सून समाचारपुढारी
राज्यातून पुढील आठवडयात मान्सून माघारी परतेल
पुणे – राज्यात पुढील ३-४ दिवस बहुतांश ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र ते छत्तीसगडदरम्यान सध्या चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर अरबी समुद्रात समांतर कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. ओडिशा राज्यावर चक्राकार वारे सक्रिय असून, या स्थितीमुळे राज्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडतच राहील, असे आयएमडी मुंबईकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला, तर विदर्भात वादळी स्वरूपाचा पाऊस झाला. पुढील आठवडयाच्या अखेरीस महाराष्ट्रातूनही मान्सून माघारी परतेल. संदर्भ – पुढारी, ८ ऑक्टोबर २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
53
0