मान्सून समाचारडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
राज्यात मान्सून परतला
राज्यात परतीच्या मान्सूनपासून पुर्वभागात मुसळधार पाऊस होईल. त्यामुळे नैऋत्य मान्सून व ईशान्य मान्सून या दोन्हीद्वारे पाऊस होणार आहे. 23 सप्टेंबरला परतीचा मान्सूनमुळे राज्याच्या पुर्वभागात जोराचा पाऊस होईन. मराठवाडयातील उस्मानाबाद, लातूर, जालना, बीड, हिंगोली, पूर्व विदर्भ व पश्मिमेकडील भागात विजांच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह या आठवडयात पाऊस होणार आहे. 27 सप्टेंबरपर्यंत पावसात उघदीप व सायंकाळी व दुपारी रब्बी पेरणीसाठी गती येईल. शेतीमध्ये पुरेशी ओल होईल. रब्बी हंगामासाठी हवामान अनुकूल राहील.
कृषी सल्ला १. रब्बी ज्वारीच्या पेरणीसाठी मराठवाडा, सांगली, सातारा, पुणे, नगर व इतर सर्वच जिल्हयात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे 65 मिमी ओलावा होताच, वापसा येताच पेरणीचे काम सुरू करावे. पेरणीनंतर सारे व पाट पाडावेत. २. करडई पेरणीसाठी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस झालेला असून, वापसा येताच, कडईची पेरणी करावी. पेरणीनंतर सारे व पाट पाडावेत. ३. पेरणीपूर्वी जमिनीची पूर्वमशागत करावी. संदर्भ – जेष्ठ कृषी हवामान तंज्ञ डॉ. रामचंद्र साबळे जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
143
0
संबंधित लेख