AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
27 Jul 19, 01:00 PM
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
दुध भेसळ रोखण्यासाठी तंत्रज्ञान आवश्यक – गिरीराज सिंह
दूध भेसळ गुणवत्तेवर चिंता व्यक्त करताना मत्स्य, पशुपालन व डेयरी मंत्री गिरीराज सिंह यांनी सांगितले की, दूध व अन्य डेयरी उत्पादनामध्ये भेसळ रोखण्यासाठी शिक्षासहित कडक नियम करणे आवश्यक आहे. सिंह म्हणाले की, भारत दूध उत्पादनामध्ये अव्वल स्थानावर आहे. दुध उत्पादनाचे अनुमान १८७.८६ लाख टन आहे. पाच वर्षामध्ये दुध उत्पादनमध्ये ५० लाख टनची कमी झाली आहे. डेयरी व्यवसायामध्ये त्याच्या गुणवत्तेवर लक्ष देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर दुधाची भेसळ रोखण्यासाठी तंत्रज्ञानदेखील गरजेचे आहे. दुध भेसळ रोखण्यासाठी १८ राज्यांमध्ये केंद्रीय दुध परिक्षण प्रयोगशाळेची स्थापना केली जाईन. त्याचबरोबर ३१३ डेयरीमध्ये दुधाची तपासणीदेखील करण्यात येईल अशी माहिती गिरीराज यांनी यावेळी दिले. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, २४ जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
38
0