AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
31 Jul 19, 10:00 AM
आंतरराष्ट्रीय कृषीनोल फार्म
कांद्याच्या लागवडीचे नवीन तंत्रज्ञान
१. बियाणे आणि पोषक घटक ट्रे मध्ये पेरले जातात आणि यंत्राद्वारे ही बियाणे मातीने झाकतात. हा ट्रे ग्रीन हाऊसमध्ये ठेवून बियाणांची उगवण केली जाते आणि यामध्ये यंत्राद्वारे पाणी दिले जाते. २. मुख्य शेतात कांद्याच्या रोपांची पुर्नलागवड केल्यानंतर, तुषार सिंचनाद्वारे पाण्याचे योग्य नियोजन केले जाते. ३. कांदा ३ महिन्याचा झाल्यानंतर, या पिकाच्या किडी व बुरशीच्या नियंत्रणासाठी यावर यंत्राद्वारे कीटकनाशक व बुरशीनाशकांची फवारणी केली जाते. ४. ४ ते ५ महिन्यांनंतर पात कापून, कांदे खोदले जाऊन ते यंत्राद्वारे बॉक्समध्ये उचलून गोळा केले जातात आणि नंतर विक्रीसाठी पाठविले जातात. संदर्भ: Noal farm
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
238
0