कृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
यंदा खरीपमध्ये तांदूळ खरेदी करण्याचे लक्ष्य १२.५० टक्के जास्त
शासनाने खरीप विपणन हंगाम २०१९-२० मध्ये न्यूनतम समर्थन मुल्य (एमएसपी) वर ४१६ लाख टन तांदूळ खरेदी करण्याचे लक्ष्य ठरविले आहे. हे मागील वर्ष असलेले लक्ष्य ३६९.७५ लाख टनपेक्षा १२.५० टक्के जास्त आहे. खादय मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितले की, मागील खरीपमध्ये लक्ष्य ३६९.७५ लाख टन होते, मात्र खरेदी ४४०.०३ लाख टन झाली. २०१८-१९ खरीपमध्ये १०.२१ करोड टन तांदळाचे रेकॉर्ड उत्पादन झाले आहे. पहिल्या ऑक्टोबर २०१९ पासून सुरू होणारे खरीप विपणन हंगाम २०१९-२० मध्ये तांदूळ प्रमुख उत्पादक राज्य पंजाब ११४ लाख टन, हरियाणा ४० लाख टन, आंध्र प्रदेश ४० लाख टन, छत्तीसगड ४८ लाख टन, पश्चिम बंगाल २३ लाख टन, बिहार १२ लाख टन व मध्य प्रदेश १४ लाख टन या राज्यांकडून तांदूळ खरेदी करण्याचे लक्ष्य आहे. केंद्र शासनाने चालू खरीप विपणन हंगाम २०१९-२० साठी ए ग्रेड तांदूळ एमएसपी १,८३५ रू. व सामान्य ग्रेड तांदूळाचे १,८१५ रू. प्रति क्विंटल निश्चित केले आहे. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, २६ ऑगस्ट २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
45
0
संबंधित लेख