पशुपालनकृषी जागरण
जनावरांमधील मुतखडा होण्याची लक्षणे व उपाय
बदलत्या काळानुसार नवीन रोग व आजारांचा जनावरांवरही परिणाम होत आहे, अशा रोगांपैकी एक म्हणजे मुतखडा त्रास. लोकांना या रोगाबद्दलची माहिती फारच कमी आहे. मुतखडयाची ही समस्या केवळ जनावरांसाठी धोकादायक नाही, तर ती प्राणघातकदेखील आहे. मेंढ्या, गाय, म्हशी आणि कुत्रा इत्यादी प्राण्यांमध्ये हा आजार सहजपणे होऊ शकतो.
जनावरांमध्ये मुतखडा होण्याची कारणे:-_x000D_ जनावरांमध्ये मुतखडयाच्या समस्येची अनेक कारणे आहेत. यांमध्ये हवामान, अन्न आणि आहारात अचानक झालेला बदल._x000D_ नर जनावरांना अधिक धोका :_x000D_ बहुतेकदा, मुतखडयाची समस्या मादी जनावरांपेक्षा नर जनावरांमध्ये जास्त असते. याबद्दल निश्चितपणे काहीही सांगितले जाऊ शकत नाही, परंतु बऱ्याच तज्ञांचा असा विश्वास आहे की, जर वैज्ञानिक दृष्ट्या पहिले तर मादी जनावरांमध्ये मूत्र नलिका खूपच विस्तृत आहे आणि यामुळे, अवांछित (नको असलेले) घटक सहजपणे काढून टाकले जातात. परंतु नर जनावरांमध्ये मूत्र नलिका पातळ आहे. ज्यामुळे मुतखडा होण्याची शक्यता जास्त आहे._x000D_ जनावरांमध्ये मुतखड्याची लक्षणे:_x000D_ १. जनावरे बहुतेकवेळा मूत्र (लघवी) करण्याचा प्रयत्न करतात, परंतु मूत्र होत नाही._x000D_ २. जनावरे अस्वस्थ होऊ लागतात, त्यामुळे सतत उठ, बस करताना दिसतात._x000D_ ३. चारा खाणे बंद करतात._x000D_ ४. सामान्य जनावरांपेक्षा आशा जनावराचे पोट किंचित फुललेले दिसते._x000D_ ज्यावेळी लक्षणे आढळतात:_x000D_ १. जनावरांच्या हालचालींवर बारीक काळजीपूर्वक लक्ष द्यावे._x000D_ २. पिण्याच्या पाण्याच्या स्वच्छतेवर जास्त लक्ष द्यावे._x000D_ ३. घरगुती उपाय न करता त्वरित पशुवैदयांना दाखवावे._x000D_ संदर्भ :- कृषी जागरण_x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!_x000D_
280
0
संबंधित लेख