AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
28 Oct 19, 01:00 PM
कृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
साखरेचे उत्पादन मागील वर्षापेक्षा कमी होण्याचा अंदाज
पहिल्या ऑक्टोबर २०१९ पासून सुरू झालेले चालू पेरणी हंगाम २०१९-२० (ऑक्टोबर ते सप्टेंबर) मध्ये साखरेच्या उत्पादनात घट होऊन २८० ते २९० लाख टन होण्याचा अंदाज आहे. जे की मागील वर्षी देशामध्ये ३३१ लाख टनचे उत्पादन झाले होते. खादय मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार, ऊस उत्पादक राज्यांकडून मिळालेल्या सुचनेनुसार, चालू पेरणी हंगाममध्ये साखरेचे उत्पादन १२ ते १३ टक्के घटण्याची शक्यता आहे. चालू पेरणी हंगामात महाराष्ट्रात दुष्काळ व पुरामुळे ऊसाच्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन कमी झाले असेल. महाराष्ट्रात मागील वर्षी १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते, जे की चालू पेरणी हंगामात राज्यामध्ये साखरेचे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत ४० लाख टन कमी होण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये चालू पेरणी हंगामात साखरेचे उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे. मात्र १५ नोव्हेंबरपासून ऊसाच्या पेरणीमध्ये वेग येण्याचा अंदाज आहे. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, २४ ऑक्टोबर २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
42
0