AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
20 Jan 20, 01:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
देशात साखर उत्पादनात २६ टक्के घट
नवी दिल्ली – देशात १५ जानेवारीपर्यंत ४४० साखर कारखान्यांचे ऊस गाळप सुरू होते. या कारखान्यांनी १ ऑक्टोबर ते १५ जानेवारीदरम्यान १०८.८ लाख टन साखर निर्मिती केली आहे. मागील वर्षी याच काळातील उत्पादनाच्या तुलनेत २६.२ टक्क्यांनी घट झाली आहे, अशी माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने प्रसिध्द केलेल्या पत्रकातून मिळाली.
देशात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. १५ जानेवारीपर्यंत ४४० साखर कारखान्यांकडून गाळप केले गेले. तर मागील वर्षी याच काळात ५११ साखर कारखाने सुरू होते. कर्नाटकातील ६३ साखर कारखान्यांनी २१.९ लाख टन साखर उत्पादन घेतले. मागील वर्षी याच काळात ६५ साखर कारखान्यांनी २६.८ लाख टन साखर उत्पादन घेतले होते. कर्नाटक साखर उत्पादनात उत्तर प्रदेश व महाराष्ट्रानंतर तीन नंबरवर आहे. देशातील साखर कारखान्यांकडे २०१८-१९ मधील हंगामातील साडेचार हजार कोटी रूपयांची थकबाकी आहे. संदर्भ - अ‍ॅग्रोवन, २० जानेवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
55
0