कृषी वार्तालोकमत
देशात ४५ लाख टन साखरेचे उत्पादन
पुणे – देशातील ४०६ साखर कारखाने १५ डिसेंबर अखेरीस सुरू झाले असून, ४५.८१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने दिली. उत्तर प्रदेशातील ११९ साखर कारखान्यांनी २१.२५
लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. मागील वर्षी याच काळामध्ये येथील ११६ कारखान्यांनी १८.९४ लाख टन साखर उत्पादित केली होती. महाराष्ट्रात १५ डिसेंबर अखेरीस ७.६६ लाख टन साखर उत्पादित झाली. मागील वर्षी याच काळात या राज्यात २९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. कर्नाटक राज्यातही १०.६२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ३.३२ लाख टनांनी साखर उत्पादन कमी आहे. गुजरातमध्ये १.५२ लाख टन, आंध्र प्रदेश व तेलंगणामध्ये ०.३०, तामिळानाडूत ०.७३, बिहार १.३५, पंजाब ०.७५, हरियाणा ०.६५ व मध्य प्रदेश ०.३५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. या राज्यातही मागील वर्षीच्या तुलनेत उत्पादनात घट नोंदविण्यात आली. संदर्भ – लोकमत, १९ डिसेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
67
0
संबंधित लेख