कृषी वार्तालोकमत
अखेर कांदा निर्यातीला मिळाले अनुदान
नवी दिल्ली: कांदयाचा पुरवठा कमी करून निर्यातीला प्रोत्साहन मिळावे म्हणून केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर पाच टक्के सबसिडी वाढवून दहा टक्के देण्याचा निर्णय घेतला आहे. निर्यात वाढल्यास कांदयाची उपलब्धता कमी होऊन भाव वाढू शकेल, त्यामुळे सबसिडी वाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने जारी निवेदनात म्हटले आहे. सध्या देशात कांदयाचे दर कोसळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, मर्चंडाईज एक्स्पोर्टस् फ्रॉम इंडिया (एमईआयएस) या योजनेंतर्गत कांदा निर्यातीवर सध्या ५ टक्के सबसिडी देण्यात येते. या सबसिडीची मुदत १२ जानेवारी २०१९ रोजी संपत आहे. सबसिडीची रक्कम १० टक्के करून ३० जून २०१९ पर्यंत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संदर्भ - लोकमत, २९ डिसेंबर २०१८
60
0
संबंधित लेख