कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
शेतीतील ‘या’ गोष्टीच्या व्यवस्थापनासाठी ५८८ करोड रू अनुदान
नवी दिल्ली: शेतीतील काडी कचरा काढण्यासाठी लागणारी मशीन खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी २०१९ मध्ये ५८८ करोड रू. अनुदान जाहीर केले आहे. मागील वर्षी ही रक्कम ५६५ करोड रू. होती. भारतीय कृषी संशोधन परिषद (आईसीएआर) चे महानिदेशनक डॉ. त्रिलोचन महापात्रा यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना शेतीतील काडीकचरा काढण्यासाठी जागृत केले जात आहे. काडी कचऱ्याला शेतीमध्ये न जाळता त्यातून उत्पन्न कसे मिळेल याविषयी विचार करावा? यामुळे वायू प्रदूषणामध्येदेखील कमी येईल आणि शेतीमध्ये पाण्याची बचतदेखील होईल. महापात्रा यांनी सांगितले की, आता शेतकरी विचार करत आहे की, काडी कचरा जाळल्याने जमिनीची खत क्षमता कमी होईल. या काडी कचऱ्याचा वापर शेतीमध्येच केला, तर ते खत म्हणून काम करतील. त्याचबरोबर २०१८ पासून ४,५०० गावे पूर्णपणे काडी कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यास लागले, जे की मागील वर्षी केवळ १०० हाच आकडा होता. काडी कचरा जाळण्याबाबत २०१८ च्या दरम्यान हरियाणामध्ये ४० से ४५ टक्क्यांची घट झाली आहे. पंजाबमध्ये १४ ते १५ टक्के व पश्चिमी उत्तर प्रदेशमध्ये २५ ते २९ टक्के घट झाली आहे. सहकारी संस्थाना ८० टक्क्यांपर्यंत आणि शेतकऱ्यांना ५० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जात आहे. काडी कचऱ्याला शेतीमध्ये एकत्रित केल्यास कार्बन, फॉस्फरसचे प्रमाण वाढते. काडी कचऱ्यासाठी कृषी विज्ञान केंद्र राज्य सरकारसोबत काम करत आहे. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, १३ ऑगस्ट २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
83
0
संबंधित लेख