AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
20 Jun 19, 01:00 PM
कृषि वार्ताद इकॉनॉमिक टाइम्स
१ करोड शेतकऱ्यांना लवकरच मिळेल किसान क्रेडिट कार्ड
नवी दिल्ली: कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी राज्य शासनाला पुढील १०० दिवसात किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या अंतर्गत एक करोड शेतकऱ्यांना घेऊन गावस्तरीय अभियान आयोजित करण्यासाठी सांगितले आहे. याव्यतिरिक्त कृषी मंत्री यांनी विभिन्न राज्यांसाठी केंद्रशासित प्रदेशांशी पीएम किसान योजनेअंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांना नोंदणीसाठी वेग वाढविण्यास सांगितला आहे. एकूण ८७ हजार करोड रूपयांच्या या योजनेअंतर्गत वर्षाच्या दरम्यान तीन टप्प्यांमध्ये समान हफ्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण सहा हजार रू. वेळेवर जमा केले जातील.
राज्याच्या कृषी मंत्रीसोबत एक व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये, केंद्रीय कृषी मंत्री यांनी सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशामधील सर्व पात्र शेतकरी कुटुंब लाभार्थींचे नामांकनच्या प्रक्रियेला वेळबध्द व पध्दतशीने पूर्ण करण्याचा आग्रह केला, जेणेकरून एप्रिल ते जुलै २०१९ च्या कालावधीसाठी पीएम किसान अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये २००० – २००० रू. ३.३० करोड शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये २.७० करोड शेतकऱ्यांन ही रक्कम देण्यात आली आहे. संदर्भ – इकोनॉमिक्स टाइम्स, १४ जून २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
171
0