मान्सून समाचारडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
राज्यात चांगल्या पावसाची शक्यता
महाराष्ट्रात या आठवडयात चांगल्या पावसाची शक्यता आहे. २१ जुलैला राज्यावरील हवेचे दाब आणखी कमी होणार असल्याने, पावसाचा जोर वाढणे शक्य आहे. काही भागात अतिवृष्टीची शक्यता ही निर्माण होईल. हीच स्थिती २२ ते २५ जुलैपर्यंत कायम राहील. २६ जुलैला हवेच्या दाबात वाढ होईल व पावसाचे प्रमाण कमी होईल. एकूणच महाराष्ट्रात आठवडाभर पाऊस अधूनमधून सुरू राहील.
कृषी सल्ला: १. सुर्यफुलाची लागवड फायदयाची २. तिळाची लागवड फायदयाची ३. एरंडीची लागवड फायदयाची ४. पाणी उपलब्ध असल्यास अडसाली ऊसाची लागवड करा ५. चाऱ्यासाठी चवळीची पेरणी फायदयाची ६. धने लागवड फायदयाची संदर्भ – जेष्ठ कृषी हवामान तंज्ञ डॉ. रामचंद्र साबळे जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
108
0
संबंधित लेख