AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
19 Dec 19, 03:00 PM
किडींचे जीवनचक्रअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कोळी किडीचे जीवनचक्र
आर्थिक महत्व:- कोळी सर्व भाज्या, फळझाडे आणि धान्य तसेच तेलबिया पिकाचे नुकसान करते. कोळीच्या काही प्रजाती रोगाचे वाहन करण्याचीदेखील कार्य करतात आणि विषाणूजन्य रोगांचा प्रसार करतात. जीवनचक्र:- अंडी:- मादी पानांच्या मागील पृष्ठभागावर जवळजवळ ३५-७० (पांढरा रंग) अंडी देतात. अंडी कालावधी सुमारे ३-४ दिवसांचा असतो. पिल्ले अवस्था:- पिल्लांची अवस्था दोन टप्प्यात असते. पहिली "प्रोटोनोम्फ" च्या रूपात आणि दुसरी "ड्यूटमनिफ". पिल्लांचा रंग गर्द लाल किंवा पिवळा असतो. या अवस्थेचा साधारणतः ३ आठवड्यांचा कालावधी असतो. पतंग (प्रौढ):- प्रौढ मुख्यतः लाल रंगाचा असतो. या अवस्थेचा कालावधी १२-३३ दिवसांचा असून हे पिकांचे नुकसान करतात. अंडी पासून प्रौढ अवस्थेपर्यंतचा जीवन चक्र कालावधी पहिला तर सुमारे ३ ते ६ आठवड्यांचा असतो. नियंत्रण:- फेनप्रोक्झिमेट ५ एसपी @१० मिली किंवा फेनाक्झाक्वीन १० ईसी @१० मिली किंवा सल्फर ८० डब्ल्यूपी @१० ग्रॅमप्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
85
6