AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
26 Jul 19, 01:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
सोयाबीन लागवडीत घट
नवी दिल्ली: देशातील महत्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस असल्याने खरीप पेरणीवर परिणाम झाला आहे. सोयाबीनच्या पेरणीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ११ टक्के घट झाली आहे. आतापर्यंत देशात ७९.८ लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली आहे. देशात २०१८-१९ जानेवारी ते जून या काळात १०८ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. सोयाबीन हे देशातील महत्वाचे तेलबिया पीक आहे. एकूण तेलबिया उत्पादनात सोयाबीनचा वाटा तब्बल ४० टक्के आहे. सोयाबीनच्या उत्पादनात घट झाल्यास देशाला मोठी खादय तेल आयात करावी लागेल. २०१८-१९ मध्ये विक्रमी ११४.८ लाख टन सोयाबीनचे उत्पादन झाले होते. सोयाबीन संशोधनाचे संचालक व्ही.एस.भाटिया म्हणाले, पावसाअभावी अनेक भागांत सोयाबीन पेरणी रखडली आहे. मात्र, उशिरा पेरणीमुळे उत्पादनातील घट टाळण्यासाठी शेतकरी कमी कालावधीच्या व उशीरा लागवडीच्या वाणांची पेरणी करीत आहेत. त्यामुळे उत्पादनात घट येणार नाही. संदर्भ – अॅग्रोवन, २३ जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
45
0