AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
16 Dec 19, 01:00 PM
कृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
गव्हाच्या पेरणीत 9.62 टक्के वाढ झाली असून एकूण 487 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे
कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार सध्याच्या रब्बीमध्ये गव्हाची पेरणी 9.6२ टक्क्यांनी वाढून 248.0 लाख हेक्टरवर झाली आहे तर अनेक राज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे रब्बी पिकांची एकूण पेरणीही 5.22 टक्क्यांनी वाढून 487.09 लाख हेक्टरवर झाली आहे. मागील वर्षी आतापर्यंत केवळ 463.33 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. चालू हंगामात डाळीची पेरणी किंचित घटून 119.16 लाख हेक्टरवर आली आहे, तर गेल्या
वर्षी डाळींची पेरणी आतापर्यंत 120.91 लाख हेक्टरवर झाली होती. रबी डाळींचे मुख्य पीक हरभरा पेरणी गेल्या वर्षी 80.50 लाख हेक्टरच्या तुलनेत 80.63 लाख हेक्टरवर झाली आहे. अन्य डाळींमध्ये सध्याच्या रब्बीमध्ये 13.75 लाख हेक्टर आणि मटारच्या 8.30 लाख हेक्टर क्षेत्रावर डाळीची पेरणी झाली आहे, तर गेल्या वर्षी यावर्षी अनुक्रमे 14.89 आणि 7.80 लाख हेक्टरमध्ये पेरणी झाली होती. उडीद व मुगाची लागवड अनुक्रमे 4.32 आणि 1.44 लाख हेक्टरवर झाली आहे. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, 14 डिसेंबर 2019 जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
120
0