सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सोलर लाईट ट्रॅप – एकात्मिक कीड नियंत्रण
एकात्मिक कीड नियंत्रण प्रणालीमध्ये यांत्रिक पध्दतीने विविध प्रकारचे साधने वापरुन जी क्रिया केली जाते, त्यास ‘कीड नियंत्रण’ म्हणतात. यात विविध प्रकारचे सापळे वापरुन त्याद्वारे कीड नियंत्रण केले जाते. सर्व प्रकारच्या किडींना आकर्षित करुन त्यांचे नियंत्रण करण्यासाठी प्रकाश सापळे वापरता येतात. प्रकाश सापळ्यांचा फ़ायदा १) किडींच्या प्रौढ अवस्थेमध्ये कीड रात्रीच्या वेळेस प्रकाशाकडे आकर्षित होतात. याच तंत्राचा वापर करुन विशिष्ट प्रकाश व्यवस्था असलेल्या लाईटचा (बल्ब) वापर करुन, त्याद्वारे किडींना आकर्षित केले जाते. २) रात्रीच्या वेळेस संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत या प्रकाशाद्वारे कीड आकर्षित करता येते. आकर्षित झालेले किडे मारण्यासाठी या प्रकाशाच्या खाली एका पसरट भांड्यात कीटकनाशकांचे किंवा रॉकेलचे द्रावण ठेवले जाते. या द्रावणात पडणारे किडे हे मारले गेल्यामुळे, शेतीतील कीड नियंत्रणात येतात. ३) जीवनचक्र पुन्हा सुरू होताना, प्रौढ अवस्था निर्णायक असते, अशा अवस्थेत किडींचे नियंत्रण करणे सोपे जाते. त्यासाठी प्रौढ कीटकांना पकडून नियंत्रित केल्यास, पुढील अवस्था आपोआप नियंत्रित होतात. नियंत्रित होणा-या किडी हुमणी, द्राक्ष, आंबा, डाळिंब पिकातील भुंगेरे वर्गीय खोड कीड, पतंग वर्गीय किडींचे प्रौढ या सापळ्याकडे आकर्षित होऊन नियंत्रित होतात. जून महिन्यातील पावसासोबतच अनेक किडी कोषावस्था संपवून बाहेर पडतात, त्यांचे जीवनचक्र सुरु होत असते, अशा काळातच प्रौढ किडींचे नियंत्रण करणे इष्ट ठरते. प्रकाश सापळ्यांच्या वापरात येणा-या अडचणी १) ग्रामीण भागात असणाऱ्या लोड शेडींगमुळे ब-याच ठिकाणी प्रकाश सापळे नियमितपणे वापरता येत नाही. संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत लाइट ट्रॅप चालू ठेवण्यासाठी अडचणी येतात. २) पावसाळ्यात लाइट ट्रॅपचा मुख्य उपयोग होत असतो. पावसाळ्यात वीज जोडणीमध्ये अडचणी येतात. नियमितपणे बल्ब चालू ठेवण्यास पावसामुळे अडचण येते. ३) यावर उपाय म्हणून सोलर चलित प्रकाश सापळे शेतीमध्ये एकरी एक या प्रमाणात लावावेत. संध्याकाळी सूर्यास्तानंतर आपोआप प्रकाश सापळा सुरु होतो आणि सुरु झाल्यापासून ४ तासात बंद देखील होतो. संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनोमी सेंटर ऑफ एक्सिलेंस
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
635
0
संबंधित लेख