कृषी वार्ताकृषी जागरण
सोलर ड्रायर' ने खराब होणार नाही भाज्या!
फक्त १९ हजार रू. मध्ये तयार केलेल्या सोलर ड्रायर मशीनमध्ये वाटाणा, कारल, कोबी व फ्लॉवर आदि एका दिवसात वाळवता येऊ शकते. हे हलक्या ऊनातदेखील काम करते, म्हणून आता शेतकऱ्यांना भाज्या खराब होण्याची चिंता करण्याची गरज नाही. 'बीएएचयू कृषी विज्ञान संस्था' ने एक 'सोलर ड्रायर' मशीन तयार केली आहे. ज्यामुळे भाज्यांना वाळवून त्या ऑफ सीजनसाठी त्याचा पुरवठा करून ठेवू शकतो. शेतकरी ऑफ सीजनमध्ये या भाज्यांना विकून पैसे ही कमवू शकतात. केंद्राच्या योजना अंतर्गत या मशीनचे वाटप शेतकऱ्यांमध्ये केले जाईन आणि त्याचे प्रशिक्षणदेखील दिले जाणार आहे. बीएएचयू कृषी विज्ञान संस्थेचे प्रोफेसर जेएस बोहरा यांनी सांगितले की, 'सूर्यप्रकाशात अन्न पदार्थ वाळविणे हे आदिकाळापासून आहे. तथापि, ऊन्हामध्ये एक साथ अनेक गोष्टींना वाळवू शकत नाही. बाहेर वाळविण्यासाठी अस्वच्छ जागा, अचानक आलेला पाऊस, उंदीर व कीडने खाद्य पदार्थ खराब होऊ शकतात. मात्र सोलर ड्रायर वापरुन १० ते १२ किलो भाज्या सहजपणे वाळवू शकतो.
सोलर ड्रायर कसे काम करतो सौर ऊर्जाने चालणाऱ्या सोलर ड्रायरमध्ये लावलेले सोलर पॅनेल ऊनाच्या गरम हवामध्ये परिवर्तित होऊन चेंबरमध्ये पाठवते. यामध्ये पंखा ही लावला आहे. ज्यामुळे गरम हवेचा संचार होतो. ड्रायरमध्ये कोणत्याही प्रकारची घाण जाऊ नये यासाठी ग्लास लावला गेला आहे. या मशीनमध्ये वाटाणा, कारल, कोबी, फ्लॉवर आदि भाज्या एका दिवसात वाळवू शकतो. सोलर ड्रायर मशीन फक्त 19 हजार रू. मध्ये तयार केले आहे. हे 'राष्ट्रीय मिशन ऑफ सस्टेनेबल एग्रीकल्चर' योजने अंतर्गत तयार केले आहे. बोहरा यांनी सांगितले की, हे हलक्या ऊनामध्येदेखील काम करते. त्याचबरोबर कडक ऊन नसतानादेखील ही मशीन काम करेल. संदर्भ – कृषी जागरण, २९ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
43
0
संबंधित लेख