AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
16 Jun 19, 01:00 PM
कृषि वार्तागांव कनेक्शन
आता, सोलर ड्रायरने वाळविणार फुले!
भारतातून निर्यात होणाऱ्या फूल उत्पादनामध्ये ७०% वाळलेली फुले व रोपे ही वेगवेगळया भागातील असतात. मात्र जागतिक बाजारपेठेत वाळलेल्या फुलांमध्ये भारताची भागीदारी ही फक्त ५% आहे. भारतीय संशोधकांनी एक सोलर ड्रायर विकसित केला आहे, जे गुलाब आणि झेंडूसारख्या फुलांचे सौंदर्य आणि गुणवत्ता सोलर ड्रायरने टिकून ठेवू शकतात. सोलर ड्रायर विकसित करणारे भारतीय कृषी संशोधन अनुसंधान संस्थेचे वैज्ञानिक डॉ. पी. के. शर्मा म्हणाले, "सोलर ड्रायर व ऊन्हामध्ये वाळविलेल्या फुलांचे रंग, रूप आणि आकाराचे मूल्यांकन केल्यावर आढळून आले की, बाहय तापमानात चढ-उतार होत असल्याने फुलांचे रंग, रूप आणि आकार प्रभावित होतो. सोलर ड्रायरमध्ये फूलांची गुणवत्ता कायम राहते.”
ऊन्हामध्ये गुलाबचे फुल वाळण्यास जवळपास ५४ तास लागतात, तर सोलर ड्रायरमध्ये हे फूल ३३ तासात वाळवू शकतात. झेंडूच्या फुलाला ऊन्हात वाळण्यास जवळपास ४८ तास लागतात, तर सोलर ड्रायरमध्ये २७ तास लागत असूनदेखील, ते उत्तम गुणवत्ता प्राप्त करतात. याच्या साहाय्याने फुले व पानांना वाळवून दीर्घ काळापर्यंत ताजेतवाने ठेवू शकतात. संदर्भ- गाव कनेक्शन, ३ जून २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
38
0