कृषी वार्तालोकमत
देशात १.२५ लाख टन साखरेचे उत्पादन
पुणे – देशातील ऊस गाळप हंगामाला सुरूवात झाली असून, २८ कारखान्यांतून १४.५० लाख टन ऊसाचे गाळप झाले आहे. त्यातून सरासरी ८.६७ टक्के उताऱ्यानुसार १.२५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदाच्या गाळप हंगामात उत्तर प्रदेश व कर्नाटक या राज्यांनी आघाडी घेतली असून अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील साखर हंगाम लांबणीवर पडला आहे.
कर्नाटकमधील ९ कारखान्यांनी ६.६७ लाख टन ऊसाचे गाळप केले असून, त्यातून ६० हजार टन साखर उत्पादित केली आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशातील १३ कारखान्यांतून सरासरी ८ टक्के साखर उताऱ्यानुसार १५ हजार टन साखरेचे उत्पादन घेतले गेले आहे. तामिळनाडू राज्यातील ६ कारखान्यांत ५.८८ लाख टन ऊस गाळप झाले असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम नोव्हेंबरच्या तिसऱ्या अथवा अखेरच्या आठवडयापासून सुरू होण्याची चिन्हे आहेत. _x000D_ देशांतर्गत ऊसक्षेत्रात घट झाल्याने साखर उत्पादनामध्येदेखील घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यंदा देशातील साखरेचे उत्पादन २६० ते २६५ लाख टन होईल. गतवर्षीच्या विक्रमी ३३१ लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा त्यात ७० लाख घट टनांची घट होण्याचा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला. _x000D_ संदर्भ – लोकमत, ५ नोव्हेंबर २०१९_x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!_x000D_
29
0
संबंधित लेख