मान्सून समाचारडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
ऑक्टोबरच्या सुरूवातीला अल्प ते मध्यम पावसाची शक्यता
महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होत असून, तो 1010 हेप्टापास्कलपर्यंत वाढेल. त्यावेळी पावसाचे प्रमाण ही कमी होईल. मात्र अनुकूल वातावरण तयार होताच, काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. 1 व 2 ऑक्टोबरलादेखील महाराष्ट्राच्या पूर्व भागात म्हणजेच मध्य व पुर्व विदर्भ, मराठवाडा येथील पूर्वेकडील जिल्हे व पश्चिम महाराष्ट्राच्या पूर्वेकडील जिल्हयात पाऊस होईल. 3 ऑक्टोबरला दक्षिण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. 4 ऑक्टोबरपर्यंत ही स्थिती कायम राहील. तसेच २८ सप्टेंबरला उत्तर पूर्व राज्यातही पावसाची शक्यता आहे. या आठवडयात सुरूवातीच्या काळात कोकणातील उत्तरेकडील भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे. कृषी सल्ला १. पेरणीसाठी अत्यंत अनुकूल हवामान असून जेथे ६५ मिमी ओलावा झाला आहे, तेथे रब्बी पिकांच्या पेरण्या कराव्यात. पेरणीनंतर सारे व पाट पाडावेत. २. भात खाचरात ५ सें.मी पाण्याची उंची राहील याची दक्षता घ्यावी. ३. पेरणीनंतर जेथे बियाणे उगवले नसेल, तेथे बियाणे टाकावे. त्याचबरोबर जेथे दाट रोपे असतील, तेथे विरळणी करावी. ४. रब्बी हंगामात लागवड करण्यासाठी कांदा, टोमॅटो, वांगी, कोबी, फ्लॉवर याची रोपवाटिका तयार करावी. संदर्भ – जेष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
82
0
संबंधित लेख