AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
02 Feb 20, 06:30 PM
पशुपालनNDDB
मुरघास तयार करण्याची पद्धत
• मका, ज्वारी, जवस, बाजरी इ. धान्य पिके सायलेज तयार करण्यासाठी उत्तम आहेत. • मुरघास तयार करण्यासाठी मका, ज्वारी या धान्य पिकांची चीक भरण्याच्या अवस्थेत त्यांची काढणी करावी. यावेळी, धान्यांमध्ये ६५-७० टक्के पाण्याचे प्रमाण असते. • मुरघास तयार करण्यासाठी खड्ड्याची जागा निवडणे फार महत्वाचे आहे. पावसाचे पाणी चांगले निचरा होऊ शकेल अशा उंच ठिकाणी खड्डे नेहमी तयार केले पाहिजेत. • मुरघास तयार करण्यासाठी चारा पिके कापून थोड्या काळासाठी शेतात सुकवण्यासाठी ठेवावे. • जेव्हा चाऱ्यामध्ये साधारण ७०% ओलावा असतो त्यावेळी तो मशीनद्वारे कापून लहान तुकडे करावे आणि खड्ड्यात दाबून भरावा. • खड्डे भरल्यानंतर ते तीन महिन्यांनी उघडावे. • एका सामान्य जनावराला दररोज २०-२५ किलो मुरघास दिला जाऊ शकतो.
दिलेली उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा!
118
32