गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
उन्हाळी पिकांसाठी बीजप्रक्रिया
आपण पिकांवर सुरुवातीला वाढणाऱ्या किडींचे कमी खर्चात बीजप्रक्रिया करून व्यवस्थापन करू शकतो. बियाणे व रोपांवर बीजप्रक्रियांचा अवलंब करावा. 1. उन्हाळी ज्वारीच्या माशीपासून संरक्षणासाठी इमाडाक्लोप्रिड ७० डब्लू एस ५ ग्रॅम प्रति किलो बियाणे मध्ये मिसळून पेरणी करावी. 2. उन्हाळी मकासाठी पेरणी करताना खोडकिडी पासून संरक्षणासाठी थायोमेथोक्झाम ७० डब्लू एस ५ ग्रॅम प्रति किलो बियाणांमध्ये मिसळून पेरावे. 3. उन्हाळी भुईमूगसाठी पेरणी करताना रसशोषक किडींपासून संरक्षणासाठी इमाडाक्लोप्रिड ७०० एफ एस ३ ग्रॅम किंवा थायोमेथोक्झाम ७० डब्लू एस १ ग्रॅम प्रति किलो बियाणांमध्ये मिसळून पेरावे. 4. उन्हाळीमूग पिकामध्ये रस शोषक किडींपासून संरक्षणासाठी थायोमेथोक्झाम ७० डब्लू एस ३ ग्रॅम किंवा अॅसिटामिप्रिड २० एस पी @प्रति किलो बियाणामध्ये मिसळून नंतर पेरणी करावी
5. उन्हाळी भेंडीच्या बियाणामध्ये इमाडाक्लोप्रिड ७० डब्लू एस @१० ग्रॅम किंवा थायोमेथोक्झाम ७० डब्लू एस ४.५ ग्राम रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी प्रति किलो बियाणामध्ये मिसळून नंतर लागवड करावी. 6. मिरची लागवडी पूर्वी इमाडाक्लोप्रिड ७० डब्लू एस @ ५ ग्रॅम प्रति किलो बियाणांमध्ये रसशोषककिडींच्या नियंत्रणासाठी मिसळून लागवड करावी. 7. रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी इमाडाक्लोप्रिड १७.८ एस एल @१० मिली किंवा थायोमेथोक्झाम २५ डब्लूजी १० ग्रॅम १० लिटर पाण्यात रोपांची मुळे पाण्यामध्ये २ तास भिजत ठेवावीत व नंतर लागवड करावी. 8. नाग अळीच्या नियंत्रणासाठी काकडी ,भोपळा व दोडका इमाडाक्लोप्रिड ७० डब्लू एस ५ ग्रॅम किंवा थायोमेथोक्झाम ७० डब्लू एस ४.५ ग्रॅम प्रति किलो बियाणांमध्ये मिसळून लागवड करावी. डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत)
309
0
संबंधित लेख