AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
15 Mar 19, 01:00 PM
कृषि वार्तान्यूज18
‘या’ योजनेचा दुसरा हप्ता १ एप्रिलला होणार जमा!
देशात लोकसभा निवडणुका घोषित झाल्यामुळे आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे ‘पंतप्रधान सन्मान शेतकरी योजने’च्या दुसऱ्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार नाही.
देशात लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे, त्यामुळे साहजिकच आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेमुळे पंतप्रधान सन्मान शेतकरी निधी योजनेचा दुसरा हप्ता जमा होणार की नाही याची सध्या चर्चा चालू आहे. मात्र ही चर्चा केवळ पोकळ आहे. कारण आचारसंहितेमुळे या योजनेचा काम थांबले जाणार नाही. या योजनेचा दुसरा हप्ता १ एप्रिलला शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रू. जमा होणार आहे. _x000D_ पंतप्रधान मोदी यांनी २४ फेब्रुवारीला उत्तर प्रदेश येथील गोरखपूर येथे या योजनेची सुरूवात केली होती. या योजनेची पहिला हप्ता दोन करोड शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. या योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी आधार नंबरची आवश्यकता नव्हती. दुसऱ्या हप्त्यासाठी आधार नंबर आवश्यक असल्याचे सांगितले आहे. _x000D_ संदर्भ – न्यूज १८ हिंदी, १२ मार्च २०१९_x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
731
0