गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आपल्या एरंड पिकाचे उंट अळी आणि पाने खाणाऱ्या अळीपासून संरक्षण करावे.
एरंड पीक देशातील बर्याच भागामध्ये पीक घेतले जाते. या पिकाची लागवड काही राज्यात भुईमूग आणि कापूस पिकामध्ये आंतरपीक म्हणून केली जाते. काही रस शोषक किडींच्या व्यतिरिक्त उंट अळी आणि पाने खाणाऱ्या अळी हि पिकाच्या शाखीय अवस्थेत एरंड पिकाचे सर्वाधीक नुकसान करतात.
एरंड, पिकामध्ये हि अळी उंटासाठी चालते म्हणूनच या अळीस ""उंटअळी"" म्हणून ओळखले जाते. त्याच्या शरीरावर अनेक रंगांचे पट्टे / डाग असतात. लहान अळ्या बाह्य भागाला खातात, तर मोठ्या अळ्या पानांतील कडेच्या आतील हरिद्रव्ये खातात, ज्यामुळे केवळ मध्यभाग व खोड राहतात. हि अळी खादाड अळी म्हणून देखील ओळखले जाते. जास्त प्रादुर्भाव असल्यास, ते एरंडीच्या फळांचा गुच्छ आणि बिया देखील खाऊ शकतात. या आळीतील प्रौढ लिंबूवर्गीय फळांमधून रस शोषून घेतात. तसेच उन्हाळ्यात बोराच्या झाडांवर राहतात. _x000D_ पाने खाणाऱ्या अळी पानांच्या खालच्या पृष्ठभागावर राहून खालील थर खाते तसेच वरच्या भागावर अर्ध पारदर्शक ठिपके दिसतात. यानंतर वाढीच्या अवस्थेत अळीचा प्रादुर्भाव वाढल्यास ती पाने, वरचा कोंब आणि फळे देखील खाते._x000D_ एकात्मिक व्यवस्थापनः_x000D_ • साधारणत: ऑगस्टच्या दुसर्या पंधरवड्यात लागवड केलेल्या पिकामध्ये उंट अळीचा प्रादुर्भाव कमी आढळून येतो._x000D_ • उंट अळी आणि पाने खाणार्या अळीतील पतंग आकर्षित करण्यासाठी आणि त्यांचे नियंत्रण करण्यासाठी प्रकाश सापळे स्थापित करावे._x000D_ • पाने खाणार्या अळी पतंगाच्या नियंत्रणासाठी प्रति एकरी ५ ते ६ फेरोमन सापळे लावावे._x000D_ • पाने खाणाऱ्या अळीतील मादीची अंडी आणि अळ्या एरंडीच्या पानावर आढळून आल्यास ते गोळा करून नष्ट करावे._x000D_ • बॅसिलस थुरिंजेनेसिस (बॅक्टेरिया आधारित पावडर) प्रति हेक्टरी @१ ते १. ५ किलो फवारणी करावी._x000D_ • पाने खाणार्या अळीतील न्यूक्लिअर पॉलिहेड्रोसिस व्हायरस (एसएनपीव्ही) प्रति हेक्टर @२५० एलयू फवारणी करावी._x000D_ • सामान्यत: भक्षक पक्षी एरंड पिकावरील उंट अळ्या खातात. त्यामुळे शेतात भक्षक पक्ष्यांना आकर्षित करणे आवश्यक आहे._x000D_ • निम तेल @ ५% किंवा कडुलिंबाच्या पानांचे अर्क @ १०% किंवा कडुनिंब आधारित फॉर्म्युलेशन @ १० मिली (१% ईसी) ते ४० मिली (0.१५% ईसी) प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी._x000D_ • जेव्हा एरंड पिकावर उंट अळीचा प्रादुर्भाव जास्त असल्याचे आढळून (प्रति ४ झाडानंतर) आल्यास कीटकनाशकांची फवारणी करावी._x000D_ डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत) जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
182
0
संबंधित लेख