AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
12 May 19, 06:00 PM
पशुपालनगांव कनेक्शन
उन्हाळ्यात जनावरांना उष्माघातापासून वाचवा!
उन्हाळ्यामध्ये पशुपालकांनी जनावरांची अधिक काळजी घेणे आवश्यक असते. यंदा अधिक तापमान व हवेच्या गरम लाटेपासून जनावरांना उष्माघाताचा धोका असतो. अधिक उष्णतेमुळे जनावरांनाची त्वचा सुकते. त्याचबरोबर दुध देणाऱ्या जनावरांची दुध उत्पादन क्षमता देखील घटते. पशुपालकांनी जनावरांनवर योग्य वेळी उपचार केल्यास, ते उष्माघातापासून वाचवू शकतात. जर जनावरे गंभीर अवस्थेत असेल, तर त्वरित पशुपालकांनी त्यांना चिकित्सकाकडे घेऊन जावे.
लक्षण: जनावरांना १०६ ते १०८ डिग्री ताप असल्यास, त्याला उष्माघाताचे लक्षण असल्याचे समजावे. या अवस्थेत जनावरे सुस्त होऊन खाणे-पिणे सोडून देतात. श्वास घेण्यासदेखील त्यांना त्रास होतो. उपचार: • या वातावरणात जनावरांना अधिक तहान लागते. जनावरांना कमीत कमी तीन वेळा पाणी पाजावे. ज्यामुळे शरीरातील तापमान नियंत्रित राहते. याशिवाय जनावरांना पाणी देताना, त्यामध्ये थोडया प्रमाणात मीठ व पीठ एकत्रित करून दयावे. • जनावरांच्या गोठा हवेशीर असावा. • ऊन्हाळ्यामध्ये जनावरांना दिवसा अंघोळ घातली पाहिजे. खास करून म्हशींना थंड पाण्याने धुतले पाहिजे. • जनावरांना थंड पाणी मर्यादित प्रमाणात पाजावे. • जनावरांना पत्र्याच्या व कमी उंची असणाऱ्या छत खाली बांधू नये. • जनावरांना हिरवा चारा देणे आवश्यक आहे. हिरवा चारा हा पोषक असून शरीरामध्ये अधिक ऊर्जा पुरविण्याचं काम करतो. हिरव्या चाऱ्यामध्ये ७० ते ९०% पर्यंत पाण्याचे प्रमाण असून, ते पाण्याची पूर्तता करतात. संदर्भ - गाव कनेक्शन जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
318
47