AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
27 Jun 19, 01:00 PM
कृषि वार्ताद इकॉनॉमिक टाइम्स
वाटाण्याच्या किंमती कमी व्हाव्यात यासाठी सरकारने उचलले पाऊल
नवी दिल्ली- शासनाने वाटाणा बियाणांच्या आयातीवर असलेली बंदी हटवली आहे. या निर्णयामुळे घरेलू बाजारात वाटाण्याच्या किंमती कमी होईन असा अंदाज आहे. यामुळे घरेलू बाजारांची मागणी पूर्ण करण्यासाठी ही मदत मिळेल. विदेश व्यापार महानिदेशालय (डीजीएफटी) च्या एका अधिसूचनाच्या अंतर्गत सांगितले आहे की, पूर्वी परवान्यासोबत आयातला परवानगी होती. आता मात्र परवान्याची गरज नाही.
वाटाणा बियाण्यांच्या आयात धोरणामध्ये सुधारणा केल्याच्या अधिसूचनात म्हटले आहे की, या महिन्याच्या सुरूवातीला जाहीर केलेल्या सरकारच्या तिसऱ्या आगाऊ अंदाजानुसार, २०१८-१९ दरम्यान डाळींचे एकूण उत्पादन २.३२ करोड टनपर्यंत असण्याचा अंदाज आहे. मागील पाच वर्षाचे एकूण उत्पादन २ करोड ६ हजार टनच्या तुलनेत २९.६ लाख टन अधिक आहे. जगात भारत हा डाळी आयात करणारा देश मानला जातो. नुकतेच, शासनाने पिवळ्या वाटाण्याची आयात काहीशा प्रमाणात थांबविली आहे. संदर्भ – इकॉनॉमिक्स टाइम्स, २६ जून २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
28
0