कृषि वार्तागांव कनेक्शन
दुष्काळात जास्त उत्पादन देणारे सोयाबीन वाण
वैज्ञानिकांनी सोयाबीनची अनुवंशिकता ओळखली आहे. या अनुवंशिकतेच्या साहाय्याने आता, सोयाबीनचे वाण विकसित करण्यास मदत मिळेल. त्याचबरोबर सोयाबीनच्या उत्पादनावर दुष्काळाचा परिणाम ही होणार नाही. भारतीय सोयाबीन अनुसंधान संस्थान, इंदोरच्या वैज्ञानिकांनी दुष्काळ सहन करणाऱ्या अनुवंशिकता असलेल्या, सोळा सोयाबीन वाणांचा अभ्यास केला आहे. या सोळा वाणांना सामान्य सिंचित अवस्थेमध्ये ठेवले गेले. यानंतर प्रयोगाच्या नियोजनानुसार पाणी ही दिले नाही. ज्यावेळी त्यामध्ये काही रोपांमध्ये सामान्य सिंचन केले होते.
भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेचे वैज्ञानिक डॉ. वीरेंद्र सिंह भाटिया यांनी सांगितले की, चार सोयाबीन जीनोटाइप (ईसी 538828, जेएस 97-52, सीसी 456548 आणि ईसी 602288) या वाणावर दुष्काळाचा परिणाम होणार नाही. या वाणांमध्ये दुष्काळाशी लढण्याची क्षमता आहे. हे वाण दुष्काळात मातीमध्ये पाणी घेण्यास व पोषक तत्वमध्ये कुशलता घेण्यास सक्षम असतात. त्यांच्या पानांमध्ये तेलकट असे तरंगणारे तत्व आहे. जे बाष्पोत्सर्जन कारणांमुळे पाणी कमी होते. सोयाबीनची शेती मुख्यत: पाऊस असलेल्या भागात केली जाते. १२ दशलक्ष टन उत्पादनासोबत सोयाबीन भारतात सर्वात वेगाने उगवणारे पीक आहेत. सर्वात जास्त सोयाबीन उत्पादक असणारे राज्य मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान आहे. संदर्भ - गाव कनेक्शन, ०६ मे २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
254
0
संबंधित लेख