कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
बासमती तांदळाचा रेकॉर्ड ४४.१५ लाख टन निर्यात
बासमती तांदळाची निर्यात वित्त वर्ष २०१८-१९ मध्ये ९ टक्क्यांची वाढ होऊन ४४.१५ लाख टन झाली आहे. ईरानची आयात मागणी वाढल्याने बासमती तांदळाच्या निर्यातीमध्ये वाढ झाली आहे. कृषी आणि प्रसंस्कृत खाद्य उत्पाद निर्यात विकास प्राधिकरण (एपीडा) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, वित्त वर्ष २०१८-१९ मध्ये बासमती तांदळामध्ये ईरानची आयात मागणी जास्त आहे. ईरान भारतातून वर्षाला ६.५ ते ७ लाख टन बासमती तांदळाची आयात करत होता, परंतु वित्त वर्ष २०१८-१९ मध्ये ईराणने १० लाख टन आयात केले आहे. या दरम्यान युरोपियन युनियनची आयात मागणी बासमती तांदळामध्ये कमी होत आहे.
वित्त वर्ष २०१८-१९ दरम्यान मुल्यानुसार बासमती तांदळाच्या निर्यातीमध्ये २३ टक्क्यांनी वाढ होऊन ३२,८०६ कोटी रुपये झाला आहे. जे की मागील वर्षी वित्त वर्षाच्या दरम्यान २६,८७१ कोटी रुपये मुल्य बासमती तांदळाची निर्यात झाली होती. बिगर-बासमती तांदळाची निर्यात मूल्यानुसार वित्त वर्ष २०१८-१९ दरम्यान घट होऊन २०,९०३ कोटी रुपये झाली आहे, जे की याच्या मागील वर्षी २३,४३७ करोड रू. मुल्यचे बिगर-बासमती तांदळाची निर्यात झाली होती. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, ३ मे २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
4
0
संबंधित लेख