AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
25 Mar 19, 10:00 AM
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
क्षारपड जमीन सुधारणेसाठी उपाय योजना
• क्षारपड जमिनीच्या पृष्ठभागावर पांढऱ्या क्षाराचा पांढरा थर येतो या जमिनीचा सामू ८.५ पेक्षा कमी असतो. • क्षारपड जमीन सुधारणेसाठी जमिनींची योग्य मशागत करून एक टक्का उतार द्यावा शेती उताराच्या आडव्या दिशेने योग्य अंतरावर चर करावेत. • शेतीला पुरेसे पाणी देऊन क्षाराचा निचरा चराद्वारे शेतीबाहेर काढावा.पिकाच्या फेरपालटीत हिरवळीची पिके घ्यावीत. • शेतीमध्ये क्षार सहनशील पिके घ्यावीत ओलिताखालील शेत पडीक ठेवू नये जमीन नेहमी लागवडीखाली ठेवावी.अन्यथा जमीन अधिक क्षारयुक्त होईल जमिनीवर आच्छादनाचा वापर करावा.
• क्षारपड जमिनीच्या सुधारणेसाठी सच्छिद्र पाईप निचरा प्रणालीचा वापर करावा. • या पद्धतीमुळे जमिनीत हवा खेळती राहण्यास मदत होते.जमिनीचा पोत सुधारतो व पाणी मुरण्याचा वेग वाढतो पिकाच्या कार्यक्षम मुळांची वाढ होते. पिक जोमदार येते जमिनीवर क्षार साठवण्याची क्रिया मंदावून जमीन लागवडी योग्य होते. संदर्भ –अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
460
0