मान्सून समाचारअॅग्रोवन
राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता
पुणे – कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे. कोल्हापूर जिल्हयाच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाडा, पूर्व विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. आजपासून मुंबईसह कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सातारा, कोल्हापूर, मराठवाडयातील औरंगाबाद, जालना, बीड, विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्हयात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. संदर्भ - अॅग्रोवन, 18 सप्टेंबर 2019
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
96
0
संबंधित लेख