मान्सून समाचारडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
पश्चिम महाराष्ट्रात आणखी 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता
महाराष्ट्रात ११ ऑगस्टला मुंबई, ठाणे, पालघर भागावर 102 तर राज्यातील मध्य भागात 1004 हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहिल्यामुळे, पावसाचे प्रमाण कमी होईल. कोकणातील ठाणे व रायगड जिल्हयात काही दिवसात 45 मिमी, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयात 75 मिमी, नाशिक 35 मिमी, नंदुरबार 15 मिमी पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात अल्पशा: ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे. विदर्भ, गडचिरोली व उर्वरित जिल्हयात काही दिवशी 30 मिमी पावसाची शक्यता असून, उर्वरित जिल्हयात हलक्या पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हयात मुसळधार पावसाची शक्यता एक ते दोन दिवस असून, यानंतर पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. सांगली, सातारा व पुणे जिल्हयात 50 ते 65 मिमी काही दिवसात पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोलापूर व नगर जिल्हयात 9 ते 15 मिमी पावसाची शक्यता आहे. 11 ऑगस्टपासून पावसाचे प्रमाण कमी होईन. कृषी सल्ला: १. शेतीमध्ये साचलेले पाणी शेतीबाहेर काढणे आवश्यक आहे. कारण जास्त काळ शेतीमध्ये पाणी साचून राहिल्यास मुळया कुजतात, पिके पिवळी पडतात व वाळतात. शेतीच्या उताराकडील बांधाचे एका कोपऱ्यातून बांधाची उंची कमी करून साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. २. गोकूळ अष्टमीनंतर शेतीमध्ये वापसा येताच, जमिनीची पूर्वमशागत करून रब्बी ज्वारीची पेरणी करावी. ३. आले व बटाटा पिकात पाणी साचले असल्यास, त्याचा निचरा करावा. ४. अडसाली ऊसाची लागवड करावी. फुले 265 किंवा को. 8632 जातीची निवड करावी. संदर्भ – जेष्ठ कृषी हवामान तंज्ञ डॉ. रामचंद्र साबळे
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
9
0
संबंधित लेख