मान्सून समाचारपुढारी
राज्यात गुरूवारपासून पावसाचा जोर
पुणे – राज्याच्या बहुतांश भागामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून, ही स्थिती बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्याच्या बहुतांश भागातील पावसाचा जोर गुरूवारपासून वाढेल, असा सुधारित अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.
पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात येत्या 2 ते 3 दिवसांत कमी दाबाचे नवे क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज आहे. हे क्षेत्र राज्याच्या जवळ पोहचल्यास विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, असे नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवडयात महाराष्ट्राच्या काही भागातून मान्सून परतेल, असे निरीक्षण हवामान तज्ज्ञांनी नोंदविले आहे. संदर्भ – पुढारी, 23 सप्टेंबर 2019 जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
127
0
संबंधित लेख