मान्सून समाचारलोकमत
राज्यात आणखी काही दिवस पाऊस
राज्यातील पुणे शहरात आणखी तीन दिवस पाऊस असणार आहे. या शहरात सोमवारी सायंकाळी तासभरात ३०.८ मिमी पावसाची नोंद झाली होती.
पुढील तीन दिवस शहरात हलक्या स्वरूपाच्या सरी येण्याची शक्यता आहे. मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ६ नोव्हेंबरला कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडयात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात हवामान कोरडे राहील. ७ नोव्हेंबरला कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ८ नोव्हेंबरला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. कोकण, गोवा, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. संदर्भ – लोकमत, ६ नोव्हेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
596
0
संबंधित लेख