AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
07 Jan 20, 01:00 PM
कृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
रब्बी पिकांची पेरणी ६०० लाख हेक्टरपेक्षा अधिक
नवी दिल्ली: चालू रब्बी हंगामात रब्बी पिकांची पेरणीत वाढ होऊन ६००.३२ लाख हेक्टरवर झाली आहे. जी मागील वर्षीच्या तुलनेत याच कालावधीत ३८.३७ लाख हेक्टर जास्त आहे. मागील वर्षी याच कालावधीत ५६१.९५ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये अनेक राज्यात पाऊस पडल्यामुळे गहूसोबतच डाळीच्या पेरणीमध्येदेखील वाढ झाली.
कृषी मंत्रालयाच्या अनुसार, रब्बीमधील प्रमुख पीक गव्हाच्या पेरणीत वाढ होऊन चालू हंगामात ३१२.८१ लाख हेक्‍टरमध्ये झाली आहे. जे सामान्य क्षेत्रफळ ३०५.५८ लाख हेक्टरपेक्षा जास्त आहे. मागील वर्षी या कालावधीपर्यंत गव्हाची पेरणी २८६.२३ लाख हेक्टरमध्ये झाली होती. डाळीची पेरणी चालू रब्बी हंगामात वाढ होऊन १४६.२४ लाख हेक्टरमध्ये झाली आहे. रब्बी डाळवर्गीयांचे मुख्य पीक हरभऱ्याची पेरणी मागील वर्षी ९३.१९ लाख हेक्टरमध्ये वाढ होऊन ९८.५२ लाख हेक्टरमध्ये झाली होती. मसूरची पेरणी चालू पेरणी रबी हंगामात १५.४६ लाख हेक्टरमध्ये व वाटाण्याची ९.२७ लाख हेक्टरमध्ये झाली होती. उडीद व मूगची पेरणी ६.४२ व ३.३१ लाख हेक्टरमध्ये झाली आहे. संदर्भ – आउटलुक अ‍ॅग्रीकल्चर, ३ जानेवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
1270
0