AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
06 Feb 19, 01:00 PM
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
फळबागा पिकांचे उत्पादन वाढून ३१.४६ करोड टन होण्याचा अंदाज
देशात फळबागा पिकांची पेरणी व उत्पादनाचे प्रमाण वाढत चालत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रथम आरंभिक अंदाजानुसार पीक हंगाम २०१८-१९ मध्ये फळबागा पिकांचे उत्पादन ३.७ टक्क्यांनी वाढून ३१.४६ करोड टन होण्याचा अंदाज आहे. कृषी मंत्रालयाच्या पहिल्या आरंभिक अंदाजानुसार, पीक हंगाम २०१८-१९ मध्ये फळबागा
पिकांची पेरणी २.५८ कोटी हेक्टरमध्ये झाली आहे. जे मागील वर्षी २०१७-१८ पेक्षा २.५४ करोड हेक्टरमध्ये जास्त आहे. शेवटी पेरणीमध्ये झालेल्या वाढीमुळे फळबागा पिकांचे उत्पादन वाढवून ३१.४६ करोड टन होण्याचा अंदाज आहे. जे मागील वर्षी ३१.१७ टन ही उत्पादन झाले होते. फळबागा पिकांचे उत्पादन मागील पाच वर्षांच्या सरासरी उत्पादनापेक्षा १० टक्के जास्त आहे. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, ३० जानेवारी २०१९
1
0