AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
26 Feb 19, 01:00 PM
कृषि वार्ताकृषी जागरण
‘या’ पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता
आकडेवारीनुसार, देशात २०१८-१९ मध्ये कॉफीचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. कर्नाटक राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळामुळे कॉफी व काळी मिरीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. कर्नाटक राज्यातील कोडागू, हसन आणि चिकमंगलूर हे जिल्हे कॉफी व काळी मिरीचे मोठे उत्पादक आहेत. या तीन जिल्ह्यांमध्ये ७० टक्के कॉफीचे उत्पादन होते. कॉफ़ी बोर्डच्या अधिकाऱ्यांच्या मते, “कॉफीच्या रोपामध्ये ब्लॅक रॉट नावाचा एक रोगदेखील पसरला आहे. ज्यामुळे कॉफीचे बीन ही पडत आहेत. २०१७-१८ च्या तुलनेत कॉफीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.”
कॉफी उत्पादक संघाचे अध्यक्ष मोहन बोपन्ना सांगतात की, “सरकारने शेतकऱ्यांना लघु योजना चालविण्यापेक्षा दीर्घकालीन योजना राबविल्या पाहिजेत की, ज्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. कर्नाटकातील काळी मिरी ही दुष्काळात आली आहे. त्याचबरोबर काळी मिरीवरदेखील कित्येक प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.” _x000D_ संदर्भ - कृषी जागरण, २२ फेब्रुवारी २०१९
48
0