आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कापूस पिकामध्ये मर रोगाचे प्रतिबंधक नियंत्रण
गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडीप नसल्या कारणाने कपाशीची वाढ मंदावलेली आणि पाने पिवळसर झालेली दिसत असेल, जमिनीत वाफसा नसणे व मुळी सक्रीय न राहणे यासाठी जबाबदार असते. ज्या वेळी पाऊस उघडेल तेव्हा तातडीने ह्युमिक घटक असलेले एखादे पोषक आणि त्यासोबत चीलेटेड मिक्स सूक्ष्म अन्नद्रव्ये एकत्रीक करून फवारणी करावे. त्याच प्रमाणे जमिनीतून बुरशीची लागण होऊ नये म्हणून कार्बेन्डाझीम+मॅंकोझेब एकत्र असणारे बुरशीनाशक 500 ग्रॅम 50 किलो डीएपी खताला चोळून सोबत मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो आणि गंधक 5 किलो प्रती एकर रिंग पद्धतीने द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
524
1
संबंधित लेख