पशुपालनगांव कनेक्शन
जनावरांचे जंतपासून संरक्षण करावे
जनावरांमध्ये जंताची समस्या ही प्रामुख्याने आढळून येते. जनावरांमध्ये जंत असल्यास त्यांचे आरोग्य निस्तेज व कमजोर दिसते. या गोष्टीमुळे पशुपालकाला आर्थिक नुकसानीच्या समस्यांना सामोरे जावे लागते. पशुपालक हे पुरेशा माहिती अभावी जनावरांना वेळोवेळी जंताचे औषध देत नाही. जर पशुपालकांनी दर तीन महिन्यांनी जंतांचे औषध दिल्यास, ते पशुपालंकासाठी फायदेशीर राहील. जसे की, आर्थिक फायद्यात ३० ते ४० टक्के वाढ होऊ शकते. जंत होण्याची लक्षणे: • जनावर जर माती खात असेल • जनावर सुस्त व कमजोर दिसते • शेण पातळ व शेणाचा वास येतो • शेणामध्ये रक्त व जंत दिसून येतात • जनावर चारा खातात तेव्हा त्यांचा शरीराचा कमी विकास व पोटाचा आकार मोठा दिसून येतो. • दुध देण्याचे प्रमाण अचानक कमी होणे. • जनावर लवकर माजावर न येणे, गाभण न राहणे.
महत्वाच्या गोष्टी • दर तीन महिन्यांनी जनावरांना जंतनाशकाचे औषध द्यावे. • आजारी व सुस्त जनावरांना पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने जंतनाशक द्यावे. • जनावरांना लसीकरणाच्या आधीच जंताचे औषध द्यावे. लसीकरण झाले असेल, तर १५ दिवसानंतर जंताचे औषध दिले पाहिजे. • जनावरांना नेहमी चांगला चारा आहारात द्यावा तसेच स्वच्छ पाणी पाजावे. संदर्भ – गाव कनेक्शन जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
846
0
संबंधित लेख